दहावी नंतर पुढे काय?
११ वी / १२ वी सायन्स कि इंजिनिअरिंग डिप्लोमा ?
योग्य शिक्षणाचा निर्णय म्हणजेच मुलांचे उज्वल भवितव्य.
दहावी वी / SSC / CBSE चा निकाल लागल्यानंतर सर्व मुलांना तसेच पालकाना दहावी नंतर पुढे काय करावे ? कोणते शिक्षण घ्यावे ? कोणते करिअर निवडावे ?असा प्रश्न पडतो. कारण दहावी नंतर योग्य शिक्षणाचा निर्णय घेणे हा विद्यार्थाच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीचा पाया असतो. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदशन मिळणे खूप गरजेचे आहे.
“ योग्य शिक्षणाचा निर्णय म्हणजेच मुलांचे उज्वल भवितव्य ” कारण आपल्या पुढील वाटचालीस शिक्षकांचे मार्गदर्शन खूप गरजेचे असते. देशात दहावी नंतर करियर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या तसेच पालकाच्या मनात शंका असते की दहावीच्या नंतर कोणता मार्ग निवडावा, कोणत्या करियर ची निवड करावी हेच आपण योग्य प्रकारे जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदशन मिळणे खूप गरजेचे आहे.
डिप्लोमा इंजिनिअरिंग उज्वल भविष्याचा राजमार्ग !!!
दहावी नंतर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर टेक्निकल डिप्लोमा / पॉलीटेकनिक हा उत्तम पर्याय आहे. दहावी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग हे एक लोकप्रिय करिअर आहे. कारण अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्राम हा व्यावहारिक प्रशिक्षण, उद्योग-विशिष्ट कौशल्ये , रोजगाराचा जलद मार्ग आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ह्या सर्वांची एकत्रित सांगड घालणारा अभ्यासक्रम आहे. ज्यामुळे डिप्लोमा इंजिनिअरिंग हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी दहावी वी नंतर करियरची उत्तम निवड ठरते.
दहावी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग हा पर्याय करियरसाठी कसा राजमार्ग आहे ह्याचे विश्लेषण सोप्या आणि समर्पक शब्दात येथे मांडले आहे.
महाराष्ट्र बोर्ड एस.एस.सी.इयत्ता 10वी निकाल 2023 अपडेट, लिंक, वेळ, तारीख ह्या माहितीसाठी https://shikshamentor.com/maharashtra-board-sss-result-2023/ इथे किल्क करा.
दहावी नंतर इंजिनिअर होण्याचे दोन मार्ग !!!
पहिला पर्याय :- दहावी नंतर डिप्लोमा / पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमास प्रवेश
दुसरा पर्याय :- दहावी नंतर ११ / १२ वी सायन्स ला प्रवेश
दहावी नंतर डिप्लोमा / पॉलीटेक्नीक / पदविका – टेक्निकल शिक्षण म्हणजे काय असते ?
पहिला पर्याय :- दहावी वी नंतर डिप्लोमा / पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमास प्रवेश :
डिप्लोमा अभ्यासक्रमास हा इंजिनिअर होणाचा सोपा मार्ग किंवा राजमार्ग सुद्धा म्हणू शकतो. डिप्लोमा अभ्यासक्रमास महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन (MSBTE) मुंबई, ची मान्यता असते व पदविका प्रदान MSBTE मार्फत होते.
डिप्लोमा अभ्यासक्रम हा इंजिनिअरिंग चा पाया मजबूत करतो. दहावी वि नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम ३ वर्षाचा असतो. आपण जो कोर्स निवडता त्याचाच अभ्यासक्रमात समावेश असतो. ३ वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर इंजिनिअरिंग ( बी. ई ) ला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो. त्यामुळे डिप्लोमा नंतर ३ वर्षात इंजिनिअरिंग डिग्री ( बी. ई ) पूर्ण होते.
डिप्लोमा अभ्यासक्रम हा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाशी संलग्नित असल्याने तसेच इंजिनिअरिंग चा ५०% अभ्यासक्रम डिप्लोमा अभ्यासक्रमात समावेश असल्यामुळे डिप्लोमा अभ्यासक्रम हा इंजिनिअरिंग चा पाया ठरतो ज्यामुळे विधार्थ्याला इंजिनिअरिंग डिग्री चा अभ्यासक्रम सोपा जातो, तसेच विधार्थ्याचे पास होण्याचे प्रमाण वाढते.
डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स लिस्ट –
- कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (Computer Engineering)
- सिव्हील इंजिनिअरिंग (Civil Engineering)
- मेकॅनिकल इंजिनियरिंग (Mechanical Engineering)
- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (Electronics & Telecommunication Engineering)
- ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering)
- केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering)
- सिव्हील अँड रूरल इंजिनिअरिंग ( Engineering)
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ( Electrical Engineering)
- इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी ( Information Technology)
दहावी नंतर डिप्लोमा / पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमाचे फायदे:
दहावी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्राम आणि ११/१२ वी विज्ञान याचे समर्पक विश्लेषण !!!
अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्रामची 11वी आणि 12वी विज्ञानाशी तुलना करणे सोपे नाही, कारण ते भिन्न ध्येये आणि परिणामांसह विविध प्रकारचे शैक्षणिक मार्ग आहेत. तथापि, काही व्यक्ती 11वी आणि 12वी विज्ञानापेक्षा अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्रामला प्राधान्य का देऊ शकतात याची काही कारणे येथे आहेत:
1. हँड्स-ऑन अनुभव :
अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्राम अनेकदा 11वी आणि 12वी विज्ञानाच्या सैद्धांतिक दृष्टिकोनाच्या तुलनेत अधिक अनुभव आणि व्यावहारिक प्रशिक्षण देतात. अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्राममधील विद्यार्थी वास्तविक-जागतिक प्रकल्पांवर काम करतात, उद्योग-मानक उपकरणे आणि सॉफ्टवेअर वापरतात आणि त्यांना नोकरीसाठी तयार होऊ शकेल असा अनुभव मिळवतात.
2. स्पेशलायझेशन :
अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्राम विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विशिष्ट क्षेत्रात, जसे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटर अभियांत्रिकी, इतरांबरोबरच तज्ञ बनवण्याची संधी देतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात नोकरी शोधताना स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. १२ नंतर इंजिनिअरिंग करीता प्रवेश घेण्यासाठी विधार्थ्याना प्रवेश परीक्षा ( Common Entrance Exam ) म्हणजेच CET अथवा JEE / JEE Advance चासुद्धा अभ्यास करावा लागतो. इंजिनिअरिंग प्रवेश करीता विद्यार्थ्यांचे PCM ग्रुप चे मार्क व CET मार्क ग्राह्य धरले जातात. १२ वि मध्ये तसेच CET मध्ये अपेक्षित मार्क न मिळाल्यास विध्यर्थी इंजिनिअरिंग च्या प्रवेशास पात्र ठरत नाही. जर विद्यार्थ्याचे इंजिनिअरिंग हे एकमेव ध्येय असेल तर त्याला १२ वि सायन्स गुणांवर आधारित डिप्लोमा च्या दुसऱ्या वर्षास प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे विधार्थ्याचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान होते.
3. वेळ आणि खर्चाची कार्यक्षमता :
अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रम हे पारंपारिक 11वी आणि 12वी विज्ञान कार्यक्रमांपेक्षा कमी कालावधीचे असतात आणि ते कमी खर्चिक देखील असतात. ज्यांना त्यांचे करिअर लवकर सुरू करायचे आहे किंवा जे अधिक परवडणारे शैक्षणिक पर्याय शोधत आहेत त्यांच्यासाठी हे त्यांना अधिक आकर्षक पर्याय बनवू शकते. ११ + १२ + CET ह्याची ट्युशन फी अवाढव्य असून २ वर्षाच्या अभ्यासक्रमाची फी लाखांच्या घरात जाते. मुलांना १२ वि बोर्ड एक्साम चा अभ्यास तसेच CET चा अभ्यास करावा लागत असल्याने मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण असतो.
4. उद्योग-संबंधित अभ्यासक्रम :
डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये पूर्णपणे तंत्र शिक्षणा वर भर दिला जातो. अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. त्यांच्याकडे बर्याचदा जॉब मार्केट आणि नवीनतम उद्योग ट्रेंडशी अधिक सुसंगत असा अभ्यासक्रम असतो, ज्यामुळे पदवीधरांना रोजगार शोधणे सोपे होते. परंतु ११/१२ वि मध्ये आणि इंजिनिअरिंग च्या प्रथम वर्षी सुद्धा विध्यार्थी सायन्स, मॅथेमॅटिकस व इतर विषय शिकतो आणि तंत्र शिक्षण दुसऱ्या वर्षापासून सुरु होते. म्हणजेच दहावी नंतर विध्यार्थी ३ वर्ष सायन्स, मॅथेमॅटिकस शिकतो आणि इंजिनिअरिंग ची पुढील ३ वर्षे तंत्र शिक्षणशिकतो. परंतु जर दहावी वि नंतर डिप्लोमा ला प्रवेश घेतल्यास विध्यार्थी डिप्लोमा ची ३ वर्षे तंत्र शिक्षण शिकतो आणि इंजिनिअरिंग ची पुढील ३ वर्षे सुद्धा तंत्र शिक्षण शिकतो. त्यामुळे डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे फौंडेशन पक्के होते व इंजिनिअरिंग सोपे जाते.
5. नोकरीच्या संधी :
अभियांत्रिकीच्या पदविकासह, विद्यार्थी उत्पादन, बांधकाम, वाहतूक आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात नोकरीच्या विविध संधींचा पाठपुरावा करू शकतात. कुशल अभियंत्यांना मोठी मागणी आहे आणि अभियांत्रिकी डिप्लोमा पदवीधरांना उच्च रोजगारक्षम बनवू शकतो. १२ वि नंतर विध्यार्थ्याला तंत्रज्ञान क्षेत्रात मध्ये नोकरीची संधी प्राप्त होत नाही. परंतु डिप्लोमा पूर्ण केल्यास विध्यार्थ्याला लगेचच तंत्रज्ञान क्षेत्रात मध्ये नोकरीची संधी प्राप्त होते. तसेच औधोगिक क्षेत्रात डिप्लोमा विध्यार्थ्याची मागणी प्रचंड आहे. डिप्लोमा विध्यार्थ्याला वयाच्या १९ / २० वर्षी नोकरीची संधी प्राप्त होते आणि मुले स्वावलंबी होतात.
तात्पर्य / समीक्षण
एकूणच, इंजिनिअर होणे हे विद्यार्थ्याचे एकमेव ध्येय असेल तर 11/12वी सायन्स करून इंजिनिअरिंगला जाण्यापेक्षा अभियांत्रिकी डिप्लोमा प्रोग्राम करून इंजिनिअरिंगला जाणे हा नक्कीच राजमार्ग ठरू शकतो.
महाराष्ट्र बोर्ड एस.एस.सी.इयत्ता 10वी निकाल 2023 अपडेट, लिंक, वेळ, तारीख ह्या माहितीसाठी https://shikshamentor.com/maharashtra-board-sss-result-2023/ इथे किल्क करा.
डिप्लोमा / पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया, पात्रता, प्रवेश साठी लागणारे कागदपत्रे , शासनाच्या कडून देण्यात येणारी स्कॉलरशिप व त्यासाठी लागणारी कागदपत्रे ह्याची संपूर्ण माहिती पुढील लेखात लवकरच www.shikshamentor.com वर प्रकाशित करण्यात येईल.